Breaking News

राजे गटाच्या नंदकुमार झणझणे यांचा भाजप मध्ये प्रवेश ; सासवड ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येईल - रणजितसिंह नाईक निंबाळकर

BJP will come to power in Saswad Gram Panchayat - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ जुलै २०२५ - शिवनंदन पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार झणझणे हे राजे गटाचे कट्टर समर्थक यांनी त्यांच्या समर्थकांसह आज मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, संतकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष विलासराव नलवडे, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सासवडे भाजपचे नेते राजेंद्र काकडे, मंडल अध्यक्ष बापुराव शिंदे, मंडल अध्यक्ष अमित रणवरे , किरण जाधव, विक्रांत झणझणे , सतीश झणझणे , मा. सरपंच   देवराम झणझणे , पांडुरंग आनपट , व इतर मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, तालुक्याच्या विकासासाठी जनतेत परिवर्तन झाले आहे. यापुढे सासवड गावाला निधी कमी पडून देणार नाही. या भागाचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. त्यामुळे जनतेने चिंता करायची नाही. नंदकुमार झणझणे यांना तालुका पातळीवर काम करण्याची संधी देण्यात येईल. आमचे जुने सहकारी राजेंद्र काकडे हे सर्वांना बरोबर घेऊन चांगले काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात सासवड ग्रामपंचायत वर भाजपची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही.

No comments