Breaking News

कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांना 20 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Farmers urged to apply till April 20 for onion subsidy

    सातारा : कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व नाफेड केंद्रांकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लाल कांद्याची विक्री केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानासाठी २० एप्रिल पूर्वी संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

    कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक व नाफेड केंद्राकडे 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

    त्यानुसार पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावयाचा असून अर्जासोबत कांदा विक्री पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, शेतकऱ्याच्या बँक पासबूकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स (आयएफएससी कोड व खाते क्रमांक तपशीलासह) जोडावयाची आहेत.

    कांदा अनुदान अर्जाचा नमुना कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, शेतकरी, थेट पणन परवानाधारक व नाफेड खरेदी केंद्र येथे निःशुल्क उपलब्ध होईल. शेतकऱ्यास साध्या कागदावर देखील विहीत माहिती नमूद करुन कागदपत्रे जोडून अर्ज करता येईल, असे ही श्री. माळी यांनी कळविले आहे.

No comments