सोमवार पेठ फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १५ - भीमशक्ती सामाजिक संस्था व जयंती मंडळ सोमवार पेठ फलटण यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, जयकुमार शिंदे भाजप उपाध्यक्ष सातारा, समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, ॲड नरसिंह निकम, अशोकराव जाधव सचिन अहिवळे, लतीफभाई तांबोळी, राजेश शिंदे, राजेश निंबाळकर, लक्ष्मण अहिवळे, उमेश काकडे, निलेश चिंचकर, सचिन कांबळे पाटील, सुमित चोरमले, प्रसाद पवार, देविदास पवार, उमेश पवार, रमेश पवार, राकेश पवार आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. याप्रसंगी भीमशक्ती सामाजिक संस्था व जयंती मंडळाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष प्रसाद शिंदे, खजिनदार रमेश चव्हाण, सचिव संजय गायकवाड, कृष्णा अहिवळे, अमोल मोरे, नितीन कांबळे, अजित मोरे, चेतन कांबळे, मच्छिंद्र आडागळे व सोमवार पेठ येथील सर्व भीमसैनिक उपस्थित होते.
No comments