Babasaheb Ambedkar Jayanti celebrations at Phaltan; Shrimant Ramraje and MP Ranjit Singh started the procession
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. शोभायात्रेचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर |
 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ करताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर समवेत सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे पाटील, विजय येवले, सचिन अहिवळे |
अभिवादन व आंबेडकरी नववर्षाचे स्वागत
गुरूवार दि. १३ रोजी रात्री ११ वाजता बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून, रात्री १२ वाजता आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी युवक व युवतींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार याबाबत मनोगते व्यक्त केली.
 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
भीमज्योतीचे स्वागत
शुक्रवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता कोळकी येथे दहिवडी येथून आणलेल्या भिमज्योतीचे स्वागत पोलीस निरीक्षक एस.एम. पाटील यांनी केले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भीमज्योत नेत असताना ठिकठिकाणी भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले.
 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करताना उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव |
मान्यवारांकडून अभिवादन
माजी महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, इन्कमटॅक्स कमिशनर तुषार मोहिते, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, पोलीस निरीक्षक एस. एम. पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, बाळासाहेब मेटकरी, जाकीरभाई मणेर, फलटण तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन सूर्यवंशी बेडके, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, तुषारभैय्या नाईक निंबाळकर, मेहबूबभाई मेटकरी, अमिरभाई शेख, रियाज इनामदार, असिफ पठाण, घनश्याम सरगर, प्रमोद निंबाळकर, खटकेवस्ती सरपंच बापूराव गावडे आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था वगैरे ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ केल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समवेत सुधीर अहिवळे, बाळासाहेब काकडे, हरीष काकडे , जय रणदिवे |
विविध उपक्रम व अन्नदान
पंचशील रिक्षा ऑटो संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. धम्मयान मित्र मंडळ, वंचित बहुजन आघाडी, भीमशक्ती सामाजिक संस्था व जयंती मंडळ सोमवार पेठ फलटण, यांच्या वतीने देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगार व कामगार संघटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा ऑटो संघटनेच्यावतीने बसस्थानकावर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
भव्य मिरवणूक
शुक्रवार दि. १४ रोजी सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मिरवणूकीचा शुभारंभ विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे पाटील, नरसिंह निकम, अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, दादासाहेब चोरमले, नानासाहेब इवरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक समारोप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने पोलीस प्रशासन, ट्रक्टर चालक, झांजपथक, लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टिम व जयंती महोत्सवास ज्यांची मदत झाली त्यासर्वांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
No comments