Breaking News

सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Two arrested for cheating on the pretext of polishing gold jewellery

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १२ : सोन्याचे दागिने पॉलिश करुन देण्याचा बहाणा करुन, ते सोन्याचे दागिने लंपास करून महिलांची फसवणूक करणाऱ्या दोघा सराईतांना ग्रामीण पोलिसांनी गुणवरे ता. फलटण येथून अटक केली आहे. संबंधितांकडून पोलिसांनी १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान ग्रामिण भागात जर अन्य  कुणाची या पध्दताने फसवणूक झाली असेल तर त्यांनी तातडीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्फ साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

    सुबोध प्रताप शहा व अबोध प्रताप शहा रा. पंछगंछिया जि. भागलपुर, बिहार अशी अटक केलेल्या दोघा सराईतांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दुधेबावी ता. फलटण येथील एका महिलेला दागिण्यांना पॉलिश करुन देतो असे सांगत हातचलाखीने तीचे ४५ हजार रुपयांचे मंगळसुत्र, गंठण व दागीने लंपास केल्याचा गुन्हा ६ मार्च २०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. सदर महिलेने संबंधित संशयीतांचे वर्णन सांगितल्याप्रमाणे व त्याप्रमाणे  दिसणारे दोघेजण पोलिसांना गुणवरे येथील मार्केट यार्डमध्ये लपून बसलेले दिसून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे आल्याने पोलिसांनी त्यांना संशयावरुन ताब्यात घेतले. यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी दुधेबावी येथील महिलेचे मंगळसुत्र व गंठण हातचलाखीने नेले असल्याचे कबुल केले. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर परांडा, कळंब पोलिस ठाणे येथेही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, ओरीसा या राज्यातही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडून दुधेबावी येथील महिलेचे दागीने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक समिर शेख, अप्पर पोलिस अधिकारी बापू बांगर, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार व पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलिस हवालदार साबळे, पोलिस नाईक अभिजीत काशिद, अमोल जगदाळे, धराडे, पोलिस काँस्टेबल महेश जगदाळे, सचिन पाटोळे, निखील गायकवाड, तुषार नलवडे व  पोलीस नाईक राणी गळवे यांनी केली.

No comments