Breaking News

मुरूम व इतर ३ गावातील ट्रान्सफॉर्मरमधून १ लाख २० हजार रुपयांच्या कॉपर तारेची चोरी

Theft of copper wire worth Rs 1 lakh 20 thousand from transformers in Murum and 3 other villages

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   - मौजे मुरूम व इतर ३ गावातील  इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर मधून चोरट्यांनी २० हजार रुपये किंमतीचे ऑइल सांडून,  १ लाख २० हजार रुपये किंमतीची  कॉपर तार चोरी करून नेल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१४/३/२०२३ रोजी रात्री, मौजे मुरूम ता. फलटण व इतर ३ गावातील  इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर खाली पाडून, त्यातील  २० हजार रुपये किंमतीचे ४०० लिटर ऑइल  जमिनीवर खाली सांडून, ट्रान्सफॉर्मर मधील  १ लाख २० हजार रुपये किंमतीची  कॉपर तार कोणीतरी अज्ञात इसमाने काढून चोरून नेली असल्याची फिर्याद राहुल अंगदराव महालिंगे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस ए. एल. काशीद करीत आहेत.

No comments