Breaking News

काझी लोकांनी एकत्रित यावे ; समाजाची प्रगती होण्यास मदत होईल - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Kazi people should come together; It will help in the progress of the society - Sanjivraje Naik Nimbalkar

काझी सेवा संघाचा मेळावा फलटण येथे संपन्न
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - काझी लोकांनी एकत्र येऊन, आपसातील वैरभाव विसरून एकत्रित विचारमंथन केल्याने, सर्वांचा फायदा होईल. काझी समाज हा मुस्लिम धर्मातील महत्वपूर्ण  धार्मिक कार्यांमध्ये मुख्य भूमिका बजावणारा घटक होता. परंतु काळाच्या ओघात काझी चे महत्व बऱ्याच ठिकाणी कमी झाले. परंतु आता या उपक्रमामुळे आणि संघटित झाल्यामुळे त्यांना त्यांचे पूर्वीचे दिवस परत जरी नाही मिळाले तरीसुद्धा त्यांची प्रगती होण्यास खूप मदत होईल. फलटण येथे घेण्यात आलेला हा मेळावा कौतुकास्पद असून, असे  उपक्रम घेऊन, विचार मंथन करावे अशी अपेक्षा महाराष्ट्र खूप असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

    काझी सेवा संघ (KSS) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शफी काझी, यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक ९ मार्च २०२३ रोजी पानसरेज मल्टीपर्पज हॉल, फलटण येथे नझीर काझी यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास  महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, काजी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शफी काझी व फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून मान्यवर उपस्थित होते.

      महाराष्ट्र काझी सेवा संघ चे (KSS) अध्यक्ष शफी काझी यांनी,  मेळाव्यात उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचा उद्देश आणि त्यातून साध्य करण्याच्या बाबी सर्वांना स्पष्ट करून सांगितल्या. 

    मेळाव्याच्या सुरुवातीस महाराष्ट्र काझी सेवा संघ( KSS)चे अध्यक्ष शफी काझी यांनी एक पुस्तक, पेन आणि अंजिराचे रोप देऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार केला. तसेच फलटण येथील  हसन काझी तसेच सातारा येथून आलेले डॉ. जलील काझी यांचा सत्कार करण्यात आला.   मेळाव्यात मोहम्मद अली काझी, रियाज काझी तसेच म्हसवड ,शिरवळ ,कराड येथून आलेल्या काझीनी आपले मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नझीर काझी यांनी केले. तसेच मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यात तरडगावचे मुसा काझी, फलटण येथील रिजवान काझी, मुनीर काझी ,मैनुद्दीन काझी, अमनभाई पानसरे ,फारुख मुल्ला, दीपंकर कांबळे , प्रोफेसर श्रेयस कांबळे ,सौ संध्याराणी सस्ते -चव्हाण , आबेद खान यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

No comments