Breaking News

इतिहासकालीन वस्तूंचे संग्रहण इतिहास जिवंत राहण्यासाठी उपयुक्त - प्रा. ओवाळे

प्रा. ओवाळे यांचे स्वागत करताना प्रभारी प्रचार्य डॉ. कदम

Archive of historical objects useful for keeping history alive - Prof. Owale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  चलनी नाणी हा एक इतिहासकालीन दस्तऐवज असून, त्यावर असलेल्या मजकुरावरून ऐतिहासिक पुरावे उपलब्ध होतात, की ज्यावरून वस्तूनिष्ठ इतिहासाची मांडणी करता येते, म्हणून अशा प्रकारच्या इतिहासकालीन वस्तूंचे संग्रहण  इतिहास जिवंत रहण्यासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन देऊर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक ओवाळे यांनी केले.

    मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने, इतिहासकालीन दुर्मिळ नाणी व ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरविले होते. श्री भगत व श्री बर्गे यांनी आपला छंद जोपासून इतिहासकालीन वस्तूंचा संग्रह केला असून, त्याचे प्रदर्शन मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे दि. १३ ते १८ मार्च दरम्यान भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक ओवाळे बोलत होते. यावेळी  मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच. कदम, इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. अनिल टिके सर उपस्थित होते.

     प्राचार्य डॉ.पी.एच. कदम यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनामुळे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला चालना मिळेल असे सांगताना, भारतात सुवर्ण नाणी व्यवहारात चालू शकली नाहीत, कारण भारतीयांना सोन्याचे जास्त आकर्षण असल्यामुळे व्यवहारात नाण्यांचा वापर न करता लोक त्याचा संग्रह करू लागले, त्यामुळे अन्य धातूंची नाणी विकसित करण्यात आली. या प्रदर्शनाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच निंबकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीही भेट दिली. या उपक्रमासाठी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल टिके, प्रा. विशाल मोरे, प्रा.योगिता मठपती व प्रा.अविनाश कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments