Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते फलटण येथे भूमिपूजन, कोणशीला व लोकार्पण समारंभ

Bhumi Pujan, Konshila and Dedication ceremony at Phaltan under the auspices of Union Minister Nitin Gadkari

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ : केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण हायस्कूल मैदान, फलटण येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे तसेच उंडवडी - कडेपठार - बारामती - फलटण रस्ता व लोणंद - सातारा   या विकास कामांचा भूमिपूजन कोण शीला व लोकार्पण समारंभ नामदार नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

       गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या फलटण बारामती या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपण त्यांना गतवर्षी पत्र दिले होते. त्यानुसार जवळपास साडेसातशे कोटींच्या या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन होणार आहे, फलटण शहरास आपण बायपास मंजूर करुन घेतला आहे. त्याचे काम अर्ध्यापर्यंत पुर्ण होत आले आहे, परंतू उर्वरीत बायपासच्या कामासाठी निधीची आवश्यकता असुन त्याचीही मागणी आपण करणार आहोत, कारण फलटण शहराच्या चारही बाजुने बायपास झाला, तर फलटणचा विकासच होणार आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातुन जो नविन पुणे बेंगलोर महामार्ग जाणार आहे, त्या महामार्गास जोडणारा तेहतीस किलोमिटरचा जोड रस्ता फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथुन करण्यात यावा अशी आपली मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वीच या मार्गाचा हवाई सर्व्हे झाला असुन, या रस्त्याची घोषणाही यावेळी केली जाणार आहे. केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून आजवर हजारो कोटींचा निधी विविध रस्ते, महामार्गासाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे फलटण येथे होणाऱ्या या कार्यक्रमास केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस आशिर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील जनतेने मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

No comments