Breaking News

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फलटणच्या दोन आरोपींना ०७ वर्ष सक्तमजुरी

07 years hard labor for two accused in case of attempted murder

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ - दुचाकी गाडीतील पेट्रोल मगितल्यानंतर शिवीगाळ झाल्याच्या कारणावरून,  एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २/९/२०१७ रोजी फलटण येथील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने दोन आरोपींना सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा तर दोन संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.

    फलटण शहर पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.०२/०९/२०१७ रोजी फिर्यादीचा मुलगा तेजस ऊर्फ सोन्या बाळु देशपांडे याची व आरोपी नामे १) आकाश ऊर्फ लैलीपप्या शिवाजी जाधव वय २५ वर्षे रा. मोती चौक, फलटण ता. फलटण जि. सातारा २) विकास दशरथ जाधव वय २४ वर्षे रा. विटभट्टीजवळ, वाघजाई मंदीराजवळ, मलटण, ता. फलटण जि. सातारा यांची,  गाडीतील पेट्रोल मागितल्यावरुन शिवीगाळ झाल्याचा राग मनात धरून, सायंकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास, आरोपी नं. १ व २ यांनी फिर्यादीचा मुलगा तेजस यास आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण येथून गणपती पाहण्यासाठी चल, असे म्हणुन, गाडीवर बसवुन, काळुबाई नगर रोड, मलठण येथे घेऊन जावुन, तेथे आरोपी नामे ३) सौ. अनिता अविनाश जाधव वय २६ वर्षे रा. जाधववस्ती, काळुबाईनगर, मलटण, ता. फलटण जि. सातारा व आरोपी नामे ४) संतोष दत्तू सस्ते वय ४५ वर्षे रा. विटभट्टीजवळ, वाघजाई मंदीराजवळ, मलठण, ता. फलटण जि. सातारा. मुळ रा. सस्तेवाडी ता. फलटण जि. सातारा. यांना बोलावुन घेतले व वरील चार आरोपींनी मिळुन, फिर्यादीच्या मुलास शिवीगाळ करुन धमकी देऊन हाताने, पायाने मारहाण करुन, तसेच चाकुचे वार करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद तेजस ऊर्फ सोन्या बाळु देशपांडे याच्या आईने फलटण शहर पोलीस स्टेशनला दाखल केली होती.

    गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री. एस.सी. मुंढे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरचा खटला सातारा येथील २ रे अति. जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. एस. आर. सालकुटे सातारा यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्री. फेरोज शेख अति. सरकारी अभियोक्ता सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहीले. नमुद केसमध्ये ८ साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद  ग्राहय मानुन न्यायाधीश यांनी दि. २३/०९/२०२३ रोजी यातील, आरोपी नं. १ व २ यांना भा.द.वि.स.क.३०७ अन्वये ७ वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी रु. ५,०००/- दंड व दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद अशी शिक्षा दिली आहे. तर आरोपी नं. ३ व ४ यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

    उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक श्री. दादाराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधीकारी म्हणुन पोलीस अंमलदार श्री संजय पाटील सहा. पोलीस फौजदार फलटण शहर स्टेशन यांनी कामकाज पाहीले. याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन सावंत, पोलीस हवा. शमशुदिन शेख, पो. हवा. गजानन फरांदे, पो. हवा. मंजूर मणेर, म.पो.हवा. रहिनाबी शेख, पो. कॉ. राजेंद्र कुंभार, म. पो. कॉ. अश्विनी घोरपडे, पो. कॉ. अमित भरते यांनी परीश्रम घेतले.

No comments