Breaking News

८२३ वर्षांची परंपरा ; कुंभार टेक फलटण येथे मकर संक्रांतीनिमित्त ओवसा कार्यक्रम संपन्न

823 years of tradition; Owsa program on the occasion of Makar Sankranti concluded at Kumbhar Tek Phaltan
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  मकर संक्रातीनिमित्त  ओवसा (वाणवसा) वाहण्याचा कार्यक्रम फलटणमध्ये उत्साहात आणि परंपरागत पध्दतीने साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक सुनिल मठपती यांच्या सहकार्याने आणि संपुर्ण मठपती समाजाच्यावतीने मकर संक्रातीचा कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. मठपती समाजाच्या महिलांसह सुधा अनिल बिडकर य इतर समाजातील महिलाही उपस्थित होत्या.  मारवाड पेठ ते कुंभार टेक पर्यंत महिला व इतर भक्तगण वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात कार्यक्रम स्थळी येऊन, वाणवसा कार्यक्रम कुंभार टेक फलटण येथे संपन्न झाला.  ओवसा (वाणवसा) कार्यक्रमाची परंपरा ८२३ वर्षापासून असल्याचा उल्लेख चक्रपाणी  लीळा चरित्रामध्ये आहे. चक्रपाणी  लीळा चरित्र पान क्रमांक ५५ मध्ये या कार्यक्रमाचा उल्लेख खालील प्रमाणे करण्यात आला आहे अशी माहिती सुनील मठपती यांनी दिली.

    द्वारे गोसावी निर नदीसी सुर्यग्रहना लागी बिजे करीती आता उत्तरेचेया नगर महाद्वारा आने आश्रीत कुंभारटेक : तेथ गोसावीयाचीया मावुसीया ओवसा केला कुंभारा करवि आवा करविला : कुंभारे केला : तव तेथ शाळेसी गौड देशीचा ब्राम्हण राहीला होता : तो आवा मंत्रे करूनी मंत्री : आन सकळ भांडे फुटेती : ऐसे तीन आवे फुटले : मग गोसावी याचीया मानुसीया गोसावीयात विनविले : मग तया सहीत आवया जवळी बीजे केले: आवयासी श्रीचरण लाविला : इतुकेनीआवा निका जाला : गौडासी आन नगर लोकासी आश्चर्य जाले : मग गोसावी आपलेया घरा बिजे कले : मग मावुसीया ओवसा केला :॥: आता कुंभार टेकाहुनी पर्वे आग्ने आश्रीत पुर्वेचे नगर महाद्वार : हनुमंता पश्चीमे असे : तेथ गोसावी सह्याद्री बिजे करीता राणी राहाविले परते न राहे : मग महाद्वारा इशान्ये पव्हे : पुर्वामुख तेथ रीगता डावेया हाता बाळानेया वरी आसन जाले : विडा जाला : राणीये तांबुळ  दान दिधले : आनस्थीती जाली : भोगीली भंगीली : मग राणीयेत संबाखुनी पव्हेया संघाते  सैह्याद्रासी बीजे केले : सवे गावीचे महाजन बाेळवित निगाले : ते सीवेसी राहावीले : मग गोसावी बिजे केले : पव्हे पुर्वे दोनी तळोलीया तेथे विहरन : महाद्वारा नैरूत्ये खोलाळेया पुर्वे तळोली : तीचा पश्चीमीली भागी लिंगाचे देवळ : तेथ विहरन तथा पश्चीम गावांत नारायणाचा मढ उत्तरामुख : तेथ गोसावी कदाचीत पुराण आइकेती : तो मढ वैश्म्हयाने बांधला : म्हणोन तयाते  वैश्येचे देवुळे म्हणती : आता नारायण मढ़ा इशान्ये आवडा एकाचेनी माने :

No comments