फलटण येथे आजपासून श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक हॉकी स्पर्धेचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ०५ : फलटण एज्युकेशन सोसायटी , फलटण जिमखाना फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती आयोजित श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ६ ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आलेले आहे . अशी माहिती श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र अॅम्युचर खो -खो असोशीएशन चे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली
स्पर्धांचा उद्घाटन समारंभ आज रविवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ सकाळी ९.०० वाजता मा. आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, फलटण येथे विधान परिषद मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू तथा उपआयुक्त राज्य कर, महाराष्ट्र. धनंजय महाडिक व फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे .
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून आठ सर्वोत्कृष्ट संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.
श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक हॉकी स्पर्धासाठी प्रमुख उपस्थिती मधे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अनिल चोरमले व जिल्हा क्रीडा अधिकारी , सातारा युवराज नाईक हे वरील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या स्पर्धा मा. आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, (घडसोली मैदान) फलटण येथे रविवार दिनांक ६ ते मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेसाठी श्रीमंत मालोजीराजे स्मृती चषक निमंत्रित हॉकी स्पर्धेचे आयोजकांकडून व फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती चे चेअरमन मा. श्री शिवाजीराव घोरपडे यांनी या क्रीडा स्पर्धेचा आनंद क्रीडा रसिकांनी घेण्याचे अवाहन केले आहे .
No comments