Breaking News

इपिलेप्सी निदानाचे उपचार शिबिराचे आयोजन

Conducting treatment camp for diagnosis of epilepsy

    सातारा :  राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन व इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 यावेळेत इपिलेप्सी  (फेफरे / अपस्मार) निदान उपचार, समुपदेशन  शिबिराचे आयोजन स्व. क्रांतीसिंह नाना पाटील, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे करण्यात आले आहे.

    या शिबिरामध्ये मुंबई येथील तज्ञ न्यूरोफीजीशीयन टिमकडून रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. तसेच तज्ञांच्या सल्‍ल्यानुसार रक्त तपासणी, ई. ई.ची. तपासणी, भौतीक उपचार, व्यवसायोपचार, पालकांचे- रुग्णांचे समुपदेशन, वाचा व भाषा विकास यावरील उपचार मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल. तसेच सर्व रुग्णांना तीन महिन्यांची औषधे मोफत दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी केले आहे.

No comments