Breaking News

शासकीय कामात अडथळा ; माजी पंचायत समिती सभापतीसह एकावर गुन्हा दाखल

Obstruction in government work; A case has been registered against one including the former Panchayat Samiti Chairman

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ : वाखरी येथील जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगत असलेल्या खोलीतील अतिक्रमण काढताना शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन वाखरी ता. फलटण येथील फलटण पंचायत समितीचे माजी सभापती रामभाऊ ढेकळे यांच्यासह अन्य एकाविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

        याबाबत वाखरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत नाथा रणपिसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या लगत असलेल्या खोलीतील अतिक्रमण काढण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी गावातील रामभाऊ नाथा ढेकळे, नवनाथ आप्पा ढेकळे व इतर सर्व रा. वाखरी यांनी मला अतिक्रमण काढून दिले नाही व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

No comments