Breaking News

सोमंथळी येथे नारळाच्या झाडांची चोरी

Theft of coconut trees in Somanthali

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : शेतातील बावीस नारळाची झाडी चोरुन नेल्याचा प्रकार सोमंथळी ता. फलटण येथे घडला आहे. या प्रकरणी तीन संशयीतांविरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

        सुनील पोपट सोडमिसे, अमोल पोपट सोडमिसे, पांडुरंग उर्फ दादा अप्पासो सोडमिसे सर्व रा. सोमंथळी ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी सोमंथळी येथील शहाजी ज्ञानदेव करचे यांच्या गट नंबर ३५७/२ मधील जमिनीतील सहा हजार सहाशे रुपये किंमतीची साडेचार फूट उंची असलेली बावीस नारळाची झाडे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वरील तीघांनी चोरुन नेली.  याबाबत करचे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढिल तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत.

No comments