Breaking News

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी वर्किंग कमिटीवर नियुक्ती

Shrimant Ramraje Naik Nimbalkar appointed to National Executive Working Committee of NCP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १७ :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीवर महाराष्ट्र  विधान परिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

       नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांची अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सदर राष्ट्रीय कार्यकारिणी उर्वरित पदाधिकारी नियुक्त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे श्रीमंत रामराजे यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली असून या नियुक्ती नंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments