Breaking News

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न

Meeting of District Development Coordination and Control  Committee concluded

    सातारा दि.16:  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील व सह अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

    जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठकीस आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य  व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    बैठकीच्या प्रारंभी केंद्रीय पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याण योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही  समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील व सह अध्यक्ष तथा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बैठकीत दिली.

    जिल्ह्यात रेल्वे विभागाशी काही प्रश्न असतील ते लेखी स्वरुपात देण्यात यावे.  या प्रश्नांना केंद्र शासनाकडून चालना कशी मिळेल यासाठीही प्रयत्न केले जातील. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावा, असेही समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील व सह अध्यक्ष तथा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बैठकीत  सांगितले.

No comments