फलटण शहरातील मटका आणि अवैध धंदे बंद करावे अन्यथा उपोषण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ जुलै २०२५ - फलटण शहरातील मटका आणि अवैध धंदे बंद करावे अन्यथा दिनांक ७ जुलै २०२५ पासून सातारा येथे उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा भाजप शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती विकी बोके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
उपविभागीय अधिकारी फलटण यांच्याकडे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण सारख्या सांस्कृतिक आणि विकसनशील शहरात मटका आणि अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू असून त्यावर कारवाई करून बंद करावे, या धंद्यामुळे अनेक जणांचे आयुष्य, संसार उध्वस्त होत आहे. तरी आपण यावर कठोर कारवाई करून लवकरात लवकर बंद करावे अन्यथा रोजी 7 जुलै 2025 ला सातारा येथे पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहे.
No comments