Breaking News

साखरवाडी येथे वृद्धासह त्याच्या सुनेस व नातीस मारहाण

Oldman and his daughter-in-law and nephew were beaten up at Sakhrwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : जुन्या भांडणाच्या कारणावरुन, दारुच्या नशेत घरात घुसून तीघांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी एका विरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.  अनिल उर्फ अण्णा भीमा यमकर रा. फुलेनगर, साखरवाडी ता. फलटण असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. 

        याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास फुलेनगर येथे रामचंद्र हनुमंत मिरेकर वय ७२ हे त्यांच्या घरात असताना तेथे येवून अनिल यमकर याने दारुच्या नशेत जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करत गजाने मारहाण केली. भांडणे सोडाविण्यास मधे आलेल्या मिरेकर यांची सून व नात यांनाही यमकर याने शिवीगाळ व दमदाटी करुन मारहाण केली व घरातील साहित्याचे नुकसान केले. रामचंद्र मिरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिल यमकर याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करीत आहेत.

No comments