Breaking News

चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मुंजवडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

After four years of follow-up, the way is clear for the renovation of Dr. Babasaheb Ambedkar Commercial Complex in Munjawadi

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ : मुंजवडी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाच्या दुरावस्थेबाबत गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. संकुलाची दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच डिजिटल फलक बसविण्याच्या मागणीची ग्रामपंचायत मुंजवडीने दखल घेत सकारात्मक कार्यवाही केल्याची माहिती युवक काँग्रेस कमिटी सातारा सरचिटणीस गंगाराम अरुण रणदिवे यांनी दिली.

    व्यापारी संकुलाच्या दुरुस्तीच्या मागण्यांकडे १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दखल न घेतल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा रणदिवे यांनी दिला होता. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही पूर्णत्वास आल्याने त्यांनी नियोजित उपोषणापासून परावृत्त होत असल्याचे जाहीर केले.

    या कार्यवाहीमुळे व्यापारी संकुलातील व्यापारी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे रणदिवे यांनी सांगितले. आपल्या पाठपुराव्यास सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पत्रकार बांधव, काँग्रेस कमिटी फलटण, ग्रामपंचायत मुंजवडी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांचे आभार मानले.

No comments