Breaking News

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी निंबळक येथील तीन भावांच्या विरोधात गुन्हा

A case against three brothers from Nimbalak for obstructing government work

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ - आळंदी - पंढरपूर पालखी महामार्ग अंतर्गत    धर्मपुरी ते लोणंद या महामार्गाचे सध्या काम चालू आहे. निंबळक ता. फलटण गावचे हद्दीत, भूसंपादन समन्वय अधिकारी यांच्या  शर्टची कॉलर धरून शिवीगाळ केली व येथे काम केले तर हात पाय तोडू अशी धमकी देऊन, तेथे काम करत असलेल्या जेसीबी वाहनास आडवे उभे राहत शासकीय कामात अडथळा  आणल्याप्रकरणी निंबळक ता. फलटण येथील तीन भावांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे निंबळक तालुका फलटण गावचे हद्दीत, आळंदी पंढरपूर पालखी मार्ग क्रमांक ९६५ धर्मपुरी ते लोणंद या महामार्गाच्या कामात, दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास निंबळक गावचे शरद मुकुंद निकम याने भूसंपादन समन्वय अधिकारी दत्तात्रय दिगंबर साळुंखे यांच्या शर्टची कॉलर धरली तसेच त्याच्या एका भावाने साळुंखे यांना शिवीगाळ केली व तुम्ही येथे काम करायचे नाही असे म्हणाला, तर दुसऱ्या भावाने तुम्ही येथे काम केले तर हात पाय तोडू अशी धमकी दिली व तिघांनी मिळून तेथे काम करत असलेल्या जेसीबी वाहनास आडवे उभे राहुन शासकीय कामात अडथळा आणला असल्याची फिर्याद  दत्तात्रय दिगंबर साळुंखे यांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे करीत आहेत.

No comments