Breaking News

जनावरांचे १०० टक्के लसीकरण करून लंम्पी बाधीत जनावरांचे विलगीकरण करावे - खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर

100 percent vaccination of animals should be done and isolation of animals in lumpy disease - eat. Ranjit Singh

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - लंम्पी रोगाने बाधीत असणाऱ्या जनावरांचे व इतर जनावरांचे १०० टक्के लसीकरण करावे व बाधीत जनावरांचे त्वरीत विलगीकरण करण्याच्या सुचना तालुका पशुवैद्यकिय अधिकारी यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.

    फलटण तालुका पशुवैद्यकिय अधिकारी नंदकुमार फाळके,व विस्तार अधिकारी संदीप भुजबळ यांचे सोबत लंम्पी आजारा बाबात खासदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बैठक घेऊन चर्चा केली.

    लंम्पी रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता बाहय किटकांवर नियंत्रण, जैव सुरक्षा नियमांचे पालन, निर्जतुंक द्रावणाच्या कीटकनाशकांची परिसरात फवारणी, इत्यादी आवश्यक या बाबीची काळजी घेणे जास्त महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगीतले असुन शेतकर्‍यांनी घाबरून न जाता आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी शासन पातळीवर सर्वतोपरी मदत करण्याच्या सुचना प्रांतअधिकारी,पशुवैदयकीय अधिकारी यांना दिल्या असुन आपण स्वतः यावर लक्ष ठेवुन या बाबत वेळोवेळी माहीती असल्याचे खासदार  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

    फलटण तालुका पशुवैद्यकिय अधिकारी नंदकुमार फाळके यांनी फलटण तालुक्यात सध्या 159 जनावरे बाधीत असनु,बाधीत जनावरां बरोबरच इतर जनावरांच्या लसीकरांनाला प्रधान्य दिले जात असुन फलटण तालुक्यात या महीना अखेरीपर्यत 100 टक्के लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे त्यानी सांगुन नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी शेतकर्‍यांनी  गोठा व गोठ्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ, हवेशीर ठेवावा. गोठ्यामध्ये पाणी साठू देऊ नये.

    गोठ्यामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये माशा, कीटक, गोचीड यांचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये. प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्या.जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाह्यअंगावर औषधे लावावीत किंवा फवारावीत. बाधित जनावरांचे त्वरित निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावे.बाधित जनावरांवर पशुवैद्यकामार्फत मार्गदर्शित उपचार करून घ्यावेत. प्रथमावस्थेत सौम्य स्वरूपात निदान करून उपचार झाल्यास कमी वेळात जनावरे पूर्णतः दुरुस्त होतात.बाधित जनावरांच्या अंगावरील गाठीचे रूपांतर जखमेत झाले तर जखम चिघळू नये यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने मलम औषधे लावावीत.वासराला बाधीत मातेच्या दुधातून रोगप्रसार होतो, त्यामुळे वासराला बाधीत गाईचे दूध पिऊ देऊ नये, त्याला निरोगी जनावराचे दूध उकळून योग्य तापमानाला थंड करून पाजावे. योग्य ती काळजी घ्यावी.रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या भागात जनावरांना एकत्र चरण्यास सोडू नये.जनावरांचा मृत्यु झाल्यास जनावराला खोल खड्ड्यात चुना टाकून पुरावे.  गोठ्यातील दुधाची भांडी, इतर साहित्य, वाहतूक वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे.रोग प्रादुर्भाव झालेल्या भागात जनावरांची खरेदी विक्री करू नये, वाहतुकीवर आळा घालावा. जनावरांच्या बाजारात जनावरांची ने आण करू नये.आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments