फलटण विमानतळावर नातवाने केला आजीचा खून
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - वडिलोपार्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरून, विमानतळ, फलटण येथे नातवाने आजीच्या डोक्यात दगड मारून व काठीने मारहाण करत खून केल्या प्रकरणी ठाकुरकी ता.फलटण येथील आकाश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१३/८/२०२२ रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास फलटण विमानतळामध्ये पश्चिम बाजुस मोकळ्या जागेत मंगल बबन शिंदे यांचा नातू आकाश सुखदेव शिंदे मुळ रा. ठाकुरकी, ता. फलटण, जि. सातारा, हल्ली रा. आवी ता. पंढरपुर, याने सामाईक असणाऱ्या वडिलोपार्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरून, चिडून जावुन, आजी मंगल बबन शिंदे वय ६५ वर्षे यांना काठीने मारहाण करून, त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी करून, जिवे ठार मारले असलेची फिर्याद आनंदा बबन शिंदे रा.ठाकुरकी, ता. फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पी.एस.आय. शिंदे करीत आहेत.
No comments