Breaking News

१४ ऑगस्ट हा दिवस फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन

Exhibition on 14th August at Naiyojan Bhawan Collector's Office on the occasion of Partition Tragedy Memorial Day

    सातारा   (जिमाका) :-  देशाला सन १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच्या अगोदर फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले,  फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या ,  दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी दुःखद

      स्मृती  दिन म्हणून पाळण्यात येत असून त्यानिमित्ताने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन भरविले जात आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांना खुले आहे अधिकाधिक लोकांनी हे प्रदर्शन पाहावे असे आवाहन  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

       फाळणी  स्मृती दिवस या दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. याचे प्रदर्शन नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2.00 वाजता पासून आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

No comments