Breaking News

कृष्णा-भीमा स्थैरीकरनाला गती देणार ; मुख्यमंत्री शिंदे यांचे खा.रणजितसिंह यांना आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
Krishna-Bhima Stharyikaran yojana will speed up the work - Chief Minister Eknath Shinde

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या भेडसावणाऱ्या शेती पाण्याचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून निरा-देवघर व कृष्णा-भिमा स्थैरीकरना कडे बघितले जाते निरा-देवघर व कृष्णा-भीमा स्थैरीकरनाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याचे काम लवकर हाती घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या मूळ गावी आले असता त्यांचे स्वागत माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्यात मतदारसंघातील विविध विकास कामान बाबत चर्चा झाली. 

धोम धरणाचे पुराचे पाणी नदीत सोडून नदीकाठच्या गावातील लोकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका आणण्या ऐवजी त्यातील काही पाणी धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडण्यात यावे अशी विनंती यावेळी मुख्यमंत्र्यांना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. या संदर्भात ताबडतोब पाणी धोम धरणातून धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे धोम धरणाचे पुराचे पाणी कॅनॉल मध्ये सोडण्यात येणार आहे.

चर्चेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा व शेती पाण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या निरा-देवघर व कृष्णा-भीमा स्थैरीकरना बाबत माहिती घेऊन निरा-देवघरचे रखडलेले व उर्वरित कामास मान्यता देऊ. तसेच कृष्णा-भीमा स्थैरीकरना संदर्भात विधिमंडळाकडून लवकरच या प्रकल्पाची मान्यता घेऊन दोन्हीही महत्त्वाकांशी प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना  दिला.

No comments