Breaking News

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढविण्याचा दृढ निश्चय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत संजीवराजे यांची निवडणुक संदर्भात चर्चा

Deputy Chief Minister Eknath Shinde and Shrimant Sanjeev Raje discuss elections, vowing to fight Zilla Parishad and Panchayat Samiti elections with strength

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.४ - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री शिवसेना पक्षप्रमुख ना.एकनाथ शिंदे यांनी आगामी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढविण्याचे आदेश स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत, तसेच त्या दृष्टिकोनातून कामाला लागावे असेही त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सांगितले आहे. सातारा येथे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे व पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, ना.भरत गोगावले  यांची आज सैनिक स्कूल ग्राउंड, सातारा येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका संदर्भात चर्चा करुन ताकदीने लढविण्याचा दृढ निश्चय केला, यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, ज्ञानेश्वर पवार, अमोल निंबाळकर, अँड.संदीप कांबळे व जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

No comments