Breaking News

विधान परिषदेमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांची हॅटट्रिक


Ramraje Naik Nimbalkar's hat trick in the Legislative Council

    फलटण (- ॲड. रोहितअहिवळे ) दि. 20 जून - विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवत, विधान परिषदेत सुद्धा विजयाची हॅटट्रिक केली आहे. 

    आज फलटणकरांचा एकच प्रश्‍न होता, तो प्रश्‍न म्हणजे ‘काय झालं?` दुपारपासून बातम्या ऐकताना, फलटण संस्थानचे अधिपती आणि विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ‘विजयी`झाले का? या फलटणकर आणि विकास आघाडीला याचे नेमके उत्तर निकाल जाहिर होताना मिळाले आणि फलटणकरांनी फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणूक जिंकून ‘इजा-बिजा-तिजा` करीत सभापती पदाकडे ‘आगेकुच` केली आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी पक्षाने सुरुवातीपासूनच ‘पहिली पसंद` श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचीच ठेवली होती. सन 1995 पासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आमदार झाल्यापासून ते आजच्या विधानपरिषदेच्या विजयापर्यंत त्यांच्या गळ्यात ‘विजश्री`ची माळ पडणे हा ‘राजयोग` आहे असेच आम्हाला वाटते. खऱ्या अर्थाने राजयोगाचे मानकरी ठरणारे फलटणचे ‘राजे` श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषद जिंकून ‘हॅटट्रिक` साधून रामराजे हे काय ‘चिज` आहेत, हे दाखवित आपले ‘ग्लॅमर` ही दाखवून दिलं आहे.

    राजयोग लाभलेल्या राजांना पराभवाला कधी सामोरे जावे लागलेच नाही, यामध्येच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचे ‘यश` आहे असेच आम्हाला वाटते. भावी सभापती पदी आरुढ होणाऱ्या सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांना हार्दिक शुभेच्छा.

No comments