Breaking News

तिरकवाडी वि.का.स.सोसायटीच्या स्वीकृत तज्ञ संचालकपदी राजाभाऊ सोनवलकर यांची निवड

Selection of Rajabhau Sonwalkar as Approved Expert Director of Tirakwadi Society

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - तिरकवाडी वि.का.स.सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे पॅनेलने सोसायटीच्या सर्व जागा जिंकत सोसायटीवर १३-० ने विजय मिळवला.

    सोसायटीच्या दिनांक १४/०६/२०२२ रोजी झालेल्या पहिल्याच मासिक मिटींगमध्ये स्वीकृत तज्ञ संचालकपदी श्री.राजाभाऊ सुखदेव सोनवलकर यांची व सौ.मालती ज्ञानेश्वर बोराटे यांची स्वीकृत तज्ञ संचालकपदी एकमताने निवड करण्यात आली.

    राजाभाऊ यांना लहानपणापासूनच समाजकार्याची खुप आवड आहे.गावातील प्रत्येकाच्या अडीअडचणीला ते धावून जातात.शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने त्यांची घरची परिस्थिती हलाख्याची होती तरीही खचून न जाता त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.त्यांनी गावात तसेच पुणे,दापोली , रत्नागिरी येथे खुप मोठा मित्र परिवार जोडला आहे. 

    त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर , आमदार दिपकराव चव्हाण, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , माजी जि.प.अध्यक्ष श्री.माणिकराव सोनवलकर, तिरकवाडी सोसायटीचे चेअरमन उत्तम कोकरे,व्हाईस चेअरमन काशिनाथ शिंदे,माजी उपसरपंच महेश सोनवलकर, ग्रामपंचायत सदस्य शिरीष सोनवलकर, ज्येष्ठ नेते अहमद शेख,माजी चेअरमन तानाजी सोनवलकर,माजी सरपंच व विद्यमान संचालक आनंदराव सोनवलकर, हनुमंत शिंदे, माजी सरपंच राजेंद्र शिंदे, श्री.विलास सोनवलकर, सोसायटीचे सचिव सचिन सोनवलकर,सर्व विद्यमान संचालक आदींनी अभिनंदन केले.

No comments