Breaking News

उपळवे विकास सोसायटी निवडणूकीत भैरवनाथ पॅनलने सर्व १३ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत विजयी उमेदवार व कार्यकर्ते

In the Upalve Vikas Society election, Bhairavnath panel won all the 13 seats by a large margin

   फलटण  : राजे गट पुरस्कृत भैरवनाथ पॅनलने उपळवे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली., उपळवे, ता. फलटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत सर्व १३ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व अबाधीत ठेवले आहे.

    महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नवनिर्वाचीत संचालकांचे अभिनंदन करतानाच मतदार बंधू - भगिनी व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

       एकूण ७२० मतदान झाले, त्यापैकी ४७ मते अवैध ठरली ६७३ वैध मतांपैकी खालीलप्रमाणे मते घेऊन राजेगट पुरस्कृत भैरवनाथ पॅनलचे उमेदवार विजयी झाले.  

        सर्वसाधारण मतदार संघ विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते - प्रदीप विष्णूपंत लंभाते उपळवे ४३३, रमेश दशरथ जाधव सावंतवाडी ४१७, बाळू श्रीरंग लंभाते उपळवे ४१३, शिवाजी व्यंकट शिंदे दऱ्याचीवाडी ३८८, प्रल्हाद राजाराम जाधव उपळवे ३७९, मानसिंग परशू कुमकले दऱ्याचीवाडी ३७१, सुरेश गेनबा रोमन वेळोशी ३५८, महादेव दादा जाधव उपळवे जी ३३६.

    महिला राखीव मतदार संघातील ६७३ वैध मतांपैकी ३९० मते घेऊन जनाबाई लक्ष्मण जाधव वेलोशी आणि ३५९ मते घेऊन लीलावती मानसिंग सावंत सावंतवाडी. 

    अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघात ६७३ वैध मतांपैकी ४२७ मते घेऊन हणमंत तुकाराम जगताप उपळवे, विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव मतदार संघातील ६७३ वैध मतांपैकी ३८१ मते घेऊन मल्हारी अन्याबा जाधव उपळवे आणि इतर मागास राखीव मतदार संघातील ६७३ वैध मतांपैकी ४०९ मते घेऊन पोपट पिराजी रासकर जाधवनगर विजयी झाले आहेत.

    सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण कार्यालयातील सहकार अधिकारी चंद्रशेखर भुजबळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, त्यांना सोसायटी सेक्रेटरी विजयकुमार ढेंबरे आणि सहाय्यक सेक्रेटरी अमोल कोलवडकर यांनी मदत केली.

No comments