Breaking News

भेसळयुक्त डांबर व ऑईलची वाहतुक ; ३५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Transport of adulterated asphalt and oil; Assets worth Rs 35 lakh 50 thousand confiscated

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ मे - फलटण शहर पोलीस बारामती पूल येथे नाकेबंदी करत असताना, लोणंद कडून येणाऱ्या दहा चाकी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये १० लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५२  बॅरल डांबर व ५ लाख १० हजार रुपये किमतीचे ३४ बॅरल ऑइल मिळून आले.  पोलिसांनी कारवाई करत २० लाख रुपये किंमतीची १० चाकी अशोक लेलँड गाडी व डांबर, ऑइल असा एकूण ३५ लाख ५०  हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, यापैकी पेट्रोलियम उत्पादने बेकायदा वाहतूक प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून डांबर वाहतुकीचा गुन्हा योग्य त्या कायद्यान्वये करण्यात येणार आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, श्री अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री भारत कृ. किंद्रे यांचे मागदर्शनाखाली श्री सुरज शिंदे पोलीस उपनिरीक्षक व फलटण शहर पोलीस स्टेशनकडील ट्राफीकचे कर्मचारी हे फलटण येथील बारामती पुल येथे नाकाबंदी करीत असताना, दिनांक १३/५/२०२२ रोजी सायंकाळी ५.४५ वाजताचे सुमारास मिळालेल्या बातमीनुसार, लोणंद बाजुकडुन एक अशोक लेलंड कंपनीचा ट्रक क्रमांक एम. एच. २५. यु. ८२९२ हा बॅरलमध्ये भेसळयुक्त डांबर व भेसळयुक्त ऑईलची वाहतुक करीत असताना संशयास्पद मिळुन आला व त्यावरील ड्रायव्हर नामे लहु बब्रुवान माने रा. चंडकाळ ता. उमरगा जि. उस्मानाबाद याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदरचा माल हा सचिन कुऱ्हाडे व इतर अनोळखी दोन यांच्या सांगण्यावरुन शिरवळ येथील राजस्थानी ढाब्याचे पाठीमागे भरलेला असुन, हैद्राबाद येथे घेऊन निघालो आहे असे सांगीतले. त्यावेळी मालाचे इन्व्हाईस पाहता सदरचा माल दिल्ली येथुन भरुन हैद्राबाद येथे खाली करण्यास निघाला असलेचे नमुद असल्याने बिलाबाबत संशय आल्याने, ड्रायव्हर लहू माने याच्याकडे विचारपुस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सदरबाबत संशास्पद वाटत असल्याने सदरचा ट्रक हा सीआरपीसी कलम १०२ प्रमाणे फलटण शहर पोलीस स्टेशन आवारात आणुन लावण्यात आला व त्याप्रमाणे स्टेशन डायरीस नोंद घेण्यात आली. दिनांक १४/५/२०२२ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी सोो, फलटण न्यायालय यांचे  कोर्टातुन सदर प्रकारणाचा तपास करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर तहसीलदार सोो, फलटण यांना पुरवठा निरीक्षक मिळणेबाबत पत्रव्यवहार करुन, पुरवठा निरीक्षक म्हणुन श्री मनोजकुमार जयसिंग काकडे हे हजर राहील्यानंतर दोन शासकीय पंच यांच्या उपस्तितीत क्रेनच्या सहाय्याने ट्रकमधील बॅरल खाली उतरावुन ते तपासुन पाहीले असता एकुण ५२ बॅरल हे भेसळयुक्त डांबराचे मिळुन आले. ज्याबाबत ड्रायव्हर लहू माने यांचेकडे कोणतेही बिल नव्हते. तसेच एकुण ३४ बॅरल हे बेकायदेशिर भेसळयुक्त ऑईलचे बॅरल मिळुन आलेने त्याचा सविस्तर पंचनामा करुन डांबराचे ५२ बॅरल, बेकायदेशिर भेसळयुक्त आईलचे ३४ बॅरल व माल ट्रक क्रमांक एम. एच. २५.यु.८२९२ असा एकुण ३५, ५०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    दिनांक १३/५/२०२२ रोजी १७.४५ वाजण्याचे सुमारास मौजे फलटण येथील बारामती पुल या ठिकाणी आरोपी नंबर १ लहू बब्रुवान माने याने इसम नामे सचिन कुऱ्हाडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व इतर २ अनोळखी इसम यांचेशी संगणमत करुन आपले ताब्यातील ट्रक क्रमांक एम.एच.२५.यु.८२९२ मध्ये बेकायदा बिगर परवाना भेसळयुक्त ३४ बॅरल ऑईल माल व ट्रकसह किंमत रुपये २५,१०,०००/- ची वाहतुक करीत असताना मिळून आला म्हणुन फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं २५५/२०२२ जिवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ व ७ भादवि ३४ अन्वये गुन्हा रजि. नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री नितीन शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक, फलटण शहर हे करीत आहेत.

तसेच पुरवठा निरीक्षक श्री मनोजकुमार जयसिंग काकडे यांचे सांगणेप्रमाणे जिवनावश्यक वस्तु कायद्यामध्ये डांबर येत नसल्याने जप्त करण्यात आलेले ५२ भेसळयुक्त डांबराचे बॅरलबाबत स्वतंत्र कारवाई करणे योग्य होणार असल्याने त्याबाबत उचित कारवाई करणेची तजवीज ठेवण्यात आली आहे.

    श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग यांचे मागदर्शनाखाली श्री भारत किंद्रे पोलीस निरीक्षक, श्री नितीन शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री सुरज शिंदे पोलीस उपनिरीक्षक, पो.हवा. सुरेश शिंदे, पो.हवा. महादेव पिसे, पो.ना. शरद तांबे, पो.ना. नितीन भोसले, पो.कॉ. अतुल बड़े, पो.कॉ, पांडुरंग धायगुडे, पो.कॉ. गणेश ठोंबरे, पो.कॉ. सहदेव साबळे यांनी सदरची कारवाई केली आहे.

No comments