Breaking News

17 मे रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

District level Women's Democracy Day on 17th May

सातारा  : माहे मे 2022 मध्ये जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार दि. 17 मे  2022 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सकाळी 11 वा. करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी व्हि. ए. तावरे यांनी दिली.

            या महिला लोकशाही दिनामध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी प्रथमत: तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये संबधित तालुक्यातील तहसिलदार तथा अध्यक्ष किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तेथे तक्रारीचे निवारण न झाल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्ज करावयाचा आहे. संबंधितांनी अर्ज द्विप्रतीत करणे आवश्यक आहे. तक्रार अर्ज, निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर पाठविणे आवश्यक आहे. तद्नंतर येणाऱ्या महिला लोकशाही दिना दिवशी मुळ अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रासह महिला लोकशाही दिनास उपस्थित राहणे आवश्यक आहे.

No comments