Breaking News

खा.रणजितसिंह यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल ; अजून अनेक गुन्हे दाखल होणार - दिगंबर आगवणे

Charges filed against MP Ranjitsingh and others; Many more crimes will be filed - Digambar Aagavane

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ : स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर फलटण न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दि. २७ एप्रिल रोजी दिले होते. परंतु या आदेशाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता, त्यानुसार   अतिरिक्त सत्र न्यायालयाने, फलटण न्यायालयाच्या आदेशास दि.९ मे २०२२ पर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयात दिनांक ९ मे ते दिनांक १२ मे पर्यंत सदर केसचे कामकाज झाले व अंतिमतः  सत्र न्यायालयाने दि.१२ मे रोजी  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी  केलेला अर्ज डिसमिस केला. त्यानंतर दि.१२ मे रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ व व्यवस्थापक यांच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंतिमतः या प्रकरणात मला सत्र न्यायालयाने न्याय दिला आहे. अद्याप पर्यंत खासदार रणजितसिंह यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झालेले आहेत, अजून  अनेक गुन्हे भविष्यात दाखल होणार असल्याचे दिगंबर आगवणे यांनी फलटण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी संगनमत करून, सुरवडी येथील जमिनीचे कागदपत्रे घेऊन माझ्या नावे पतसंस्थेतून एक कोटी कर्ज उचलले व माझी फसवणूक केली असल्याची तक्रार दिगंबर आगवणे यांनी फलटण न्यायालयात केली होती,  दिगंबर आगवणे यांनी केलेल्या अर्जावर फलटण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये पोलिसांना, पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आणि ३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले होते.

No comments