Breaking News

मातोश्री ग्राम समृध्दी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत फलटण तालुक्यात ४० पाणंद रस्त्यांना मंजूरी

Sanction of 40 Panand roads in Phaltan taluka under Matoshri Gram Samrudhi Shet / Panand Road Scheme

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)   : महाराष्ट्र शासन नियोजन विभागांतर्गत मातोश्री ग्राम समृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने अंतर्गत सन २०२२ - २०२३ च्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये फलटणतालुक्यातील ४० पाणंद रस्त्यांना रोहयो अंतर्गत मंजूरी मिळाली असल्याचे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

        फलटण तालुक्यातील मंजूर झालेल्या या ४० पाणंद रस्त्यांमध्ये - अलगुडेवाडी ग्रामपंचायत ते आसू पाणंद रस्ता, बारामती रोड ते धुळदेव मंदिर पाणंद रस्ता, आंदरुड - बरड - गुणवरे त्यापैकी धनगरवाडा ते बरड पाणंद रस्ता, शिंदे वस्ती ते वामन केंजळे घर पाणंद रस्ता, आळजापुर ते आदर्की बु|| वेस पाणंद रस्ता, फलटण आसू रस्ता ते बेडके वस्ती पाणंद रस्ता, फलटण आसू रस्ता ते खटकेवाडा पाणंद रस्ता, टाकुबाईचीवाडी तलाव ते जलस्वराज विहीर पाणंद रस्ता करणे, टाकुबाईचीवाडी येथे जावळी शेत ते गडद शेत पाणंद  रस्ता करणे, पवारवाड़ी एमएसईबी सब स्टेशन ते तावरे वस्ती पाणंद रस्ता करणे, पवारवाडी अंतर्गत पाणंद रस्ता करणे, पाडेगाव ते कोरेगाव पाणंद रस्ता करणे, पाडेगाव कॅनाल पूल ते नवले वस्ती पाणंद रस्ता करणे, शेरेवाडी ते पिराचीवाडी पाणंद रस्ता करणे, पिराचीवाडी स्वागत कमान ते ढवळ वाडा पाणंद रस्ता करणे, फडतरवाडी येथे ओढा पूल ते १८ फाटा पाणंद रस्ता करणे, बरड येथे गावडेवस्ती पाणंद रस्ता करणे, मठाचीवाडी येथे तावरे नगर ते शेलार वस्ती पाणंद रस्ता करणे, माळेवाडी स्मशानभूमी पाणंद रस्ता करणे, मिरढे ते पाझर तलाव पाणंद रस्ता करणे, मिरेवाडी कुसुर ते येळे वस्ती पाणंद रस्ता करणे, गुणवरे मुंजवडी रस्ता ते कदम वस्ती पाणंद रस्ता करणे, मुंजवडी येथे राम ओटा ते पवार वस्ती पाणंद रस्ता करणे, राजुरी येथे खुरंगेवस्ती ते माळवेवस्ती पाणंद रस्ता करणे, राजुरी येथे पळसकर वस्ती पाणंद रस्ता करणे, रावडी बुद्रुक येथे आसू पाडेगाव रस्ता ते पाटील वस्ती पाणंद रस्ता करणे, वडले येथे जिल्हा परिषद प्रा. शाळा ते नवीन धनगरवाडा बोराटे वस्ती पाणंद रस्ता करणे, वडले प्रा. शाळा ते जुना धनगरवाडा पाणंद रस्ता करणे, वाखरी शिंदेवस्ती ते सुतार वस्ती ते वाठार निबाळकर पाणंद रस्ता करणे, वाघोशी गावठाण ते वाघदरा पाणंद रस्ता करणे, वाघोशी माळ ते नवा मळा पाणंद रस्ता करणे, वाठार निंबाळकर अंतर्गत फलटण - पुसेगाव रस्ता ते कुदळे वस्ती पाणंद रस्ता करणे, वाठार निंबाळकर अंतर्गत फलटण - पुसेगाव रस्ता ते बनकर वस्ती पाणंद रस्ता करणे, विठ्ठलवाडी ते काळज पाणंद रस्ता करणे, विडणी शिवाजी महाराज मठ ते गायकवाड वस्ती पाणंद रस्ता करणे, हणमंतवाडी जिल्हा बँक ते हणमंतवाडी चौक पाणंद रस्ता करणे, हणमंतवाडी येथे प्रजिमा नवीन ग्रामपंचायत ते आटा पूल पाणंद रस्ता करणे, होळ साखरवाडी ते मेटकरी वस्ती पाणंद रस्ता करणे या ४० पाणंद रस्त्यांच्या कामांना फलटण तालुक्यात रोहयो अंतर्गत मंजूरी मिळाली असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments