Breaking News

गुन्हा दाखल होत नसल्याने दिगंबर आगवणे यांचा आत्महत्येचा पवित्रा

Digambar Aagwane commits suicide as no case has been registered

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ : स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर फलटण न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देवूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिस चालढकल करीत असल्याचा आरोप करुन दिगंबर आगवणे यांनी आज (बुधवार) फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर आत्महत्या करण्याचा पवित्रा घेतल्याने येथील परिस्थिती तणावपुर्ण बनली होती. 

    दिगंबर आगवणे यांनी केलेल्या अर्जावर फलटण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ठाकूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये पोलिसांना स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आणि ३ महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहेत.        

    सदर आदेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी दिगंबर आगवणे दुपारी साडेबाराच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले होते. परंतू गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये पोलिसांकडून चालढकल होत  असल्याचा आरोप करुन आगवणे यांनी गुन्हा दाखल होत नसेल तर आपण आत्महत्या करू असा पवित्रा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याबाहेर घेतला.

     यादरम्यान फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, पोलिस ठाण्यात स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या फलटण न्यायालयाच्या आदेशाला दि. ९ मे २०२२ पर्यंत स्थगिती आदेश प्राप्त झाला, त्यानुसार फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला जिल्हा सत्र न्यायालयानकडून दि. ९ मे २०२२ पर्यंत स्थगिती मिळाल्याने सदरचा गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे सांगितले.

No comments