Breaking News

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री यांची भेट

Chief Minister's visit to the exhibition organized on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's birthday

    मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात विविध विभागांना भेटी दिल्या व कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच सूचनाही दिल्या.   

    प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुले वाहून अभिवादन केले. यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्याची पाहणी करून सूचनाही दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments