Breaking News

‘वंदे मातरम्‌’ने अर्थसंकल्पिय अधिवेशनास सुरुवात

‘Vande Mataram’ marks the beginning of the budget session

    मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून, विधानसभा आणि विधान परिषदेत ‘वंदे मातरम्‌‘ने सकाळी कामकाजास सुरुवात झाली.

    विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संसदीय कार्य मंत्री ॲङ अनिल परब, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

    विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, यांच्यासह  मंत्री-राज्यमंत्री आणि विधानसभेचे सदस्य उपस्थित होते.

No comments