जाधववाडी येथील लकडे बझार मध्ये चोरी ; तेल, गहू असा 73 हजार रुपयांचा माल लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ मार्च - जाधववाडी ता.फलटण येथील लकडे बझारच्या शटर लॉकच्या पट्ट्या तोडुन आत प्रवेश करुन, बझारमधील तेल, गहू, गिफ्ट सेट व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार २५० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरी दिनांक ९ मार्च २०२२ रोजी रात्रौ ८.२० वाजता ते दिनांक १० मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान, रोहीदास रखमाजी लकडे रा.अक्षयव्हीला अपार्टमेंट, जाधववाडी ता. फलटण यांच्या जाधववाडी येथील लकडे बझार, या किराणा व गृहउपयोगी वस्तूंच्या दुकानाच्या शटर लॉकच्या पट्ट्या, अज्ञात चोरट्यांनी, कशाने तरी तोडुन, आत प्रवेश करुन, बझार मधील १७ हजार ३०० रुपये किमतीचे जेमिनी सोयाबिन तेलाचे १५ किलो वजनाचे २१ डबे, २९ हजार २५० रुपये किंमतीचे जेमिनी सोयाबिन तेलाचे १५ लिटर वजनाचे ३३ डबे, ५ हजार २०० रुपयांचे राधोनि पाम तेलाचे १५ किलो वजनाचे ६ डबे, ८ हजार ५०० रुपयांचे गहु देवासा/ पांचाली ५० किलो वजनाची ८ भरलेली पोती, ३ हजार रुपये किंमतीचे भांड्याचे गिफ्ट सेट व १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण एकूण ७३ हजार २५० रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद रोहीदास रखमाजी लकडे यांनी दिली आहे.
No comments