लोककलेच्या माध्यमातून फलटण व खंडाळा तालुक्यात आधार सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून विकास योजनांची माहिती
Information of development schemes through Aadhar Social Development Organization in Phaltan and Khandala talukas through folk art
सातारा दि. 10: राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आधार सामाजिक विकास संस्थेच्या कलापथकाद्वारे फलटण तालुक्यातील तरडगाव, साखरवाडी व खंडाळा तालुक्यातील लोणंद व खंडाळा या गावांमध्ये जनजागृती करण्यात आली.
राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत असा या मोहिमेचा उद्देश आहे. आज फलटण तालुक्यातील तरडगाव व साखरवाडी व खंडाळा तालुक्यातील लोणंद व खंडाळा या गावांमध्ये कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे.
No comments