Breaking News

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला कु. स्वरा भागवतचा सत्कार

Swara Bhagwat was felicitated by Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    गोखळी (गंधवार्ता वृत्तसेवा)  : शिवजयंती दिनी न कळसुबाई शिखर अवघ्या १ तास ५६ मिनिटांमध्ये कु. स्वरा योगेश भागवत या ७ वर्षीय चिमुकलीने सर करुन पहिला अनोखा विक्रम केल्याबद्दल महाराष्ट विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिच्या कामगिरीचे कौतुक करुन तिला पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

   लक्ष्मी विलास पॅलेस या आपल्या निवासस्थानी शाल, बुके, ट्रॅक सूट देवून कु. स्वरा भागवतचा यथोचित गौरव श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला. 

    महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर अवघ्या ७ वर्षाच्या कु. स्वरा भागवत हिने चालत जावून कमी वेळात शिखर सर केले. कळसुबाई सर करणारी स्वरा ही सर्वात लहान एकमेव मुलगी ठरली आहे. याबद्दल जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे. कु. स्वराने यापूर्वी सायकलिंग, एका मिनिटात १०० पुश्पप, ५० प्रकारच्या दोरीच्या उड्या मारल्या असून तिच्या या कामगिरीची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. तिच्या या मोहिमेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, माजी सभापती शंकरराव माडकर, जयकुमार इंगळे, निंभोरेचे उपसरपंच मुकुंद रणवरे, योगायोग फोटोचे नामदेव नाळे, योगेश भागवत, लखन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments