Breaking News

न्यू फलटण शुगर डिस्टलरीत भीषण आग ; आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश

Fire at New Phaltan Sugar Distillery; Success of fire brigade in extinguishing the fire

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा): साखरवाडी - सुरवडी रस्त्याच्या बाजूला, मुख्य रस्त्यापासून दूर अंतरावर सुरवडी ता. फलटण गावच्या हद्दीतील न्यू फलटण शुगर डिस्टलरी विभागांमध्ये शुक्रवार दि. ४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे कंपनीच्या बॉयलर साठी साठवून ठेवलेल्या बगॅसच्या गंजीला  अचानक आग लागली.

     थोड्याच वेळात आगीने रौद्र रुप धारण केले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मात्र सुमारे ३०० ते ४०० टन बगॅस जळाल्याने मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

    अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाचे दोन बंब बोलाविण्यात आले सुमारे ४/५ तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात अग्निशामक  दलाला यश आले.

No comments