Breaking News

नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून संजय जामदार यांनी मोठा पारमार्थिक लाभ प्राप्त केला : प. पू. राहेरकर बाबा

Through the Narmada Parikrama, Sanjay Jamdar achieved great transcendental benefits - Raherkar Baba

 फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -: नर्मदा नदी किनारी अनेक देवदेवता, ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आहे, अनेक सिद्ध पुरुषांच्या समाधी  या परिसरात आहेत. या सर्वांची दर्शने घेवून संजय जामदार यांनी नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून मोठा पारमार्थिक लाभ प्राप्त केल्याचे प्रतिपादन ब्रम्हविद्या संशोधन व संपादन संस्था श्रीकृष्ण महानुभाव आश्रम, तरडगांव ता. फलटणचे मठाधिपती प. पू. राहेरकर बाबा यांनी केले आहे. 

     वृत्तपत्र जाहिरात क्षेत्रात फलटण येथे कार्यरत असणाऱ्या संजय जामदार यांनी नुकतीच सायकल वरून नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार व नर्मदा परिक्रमेविषयी माहिती अशा  मार्गदर्शन करताना प. पू. राहेरकर बाबा बोलत होते.

     नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने  कोळकी येथील निवास स्थानापासून पुन्हा निवासस्थानापर्यंत सुमारे  पाच हजार पाचशे कि. मी. अंतराचा संपूर्ण प्रवास संजय जामदार यांनी  सायकलवरुन करताना १०० दिवसात नर्मदा नदीला पुर्ण प्रदक्षिणा घातली. नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. 

       अध्यात्म क्षेत्रात नर्मदा नदी भगवान शंकराची कन्या मानतात. तीची पहिली परिक्रमा श्री मार्कंडेय ऋषींनी केली होती. नर्मदेच्या दोन्ही किनाऱ्यावर ओंकारेश्वर, ममलेश्वर, वासुदेवानंद सरस्वतींची समाधी, गरुडेश्वर, श्रीरंग अवधुत महाराजांची समाधी, नारेश्वर, गौरीशंकर महाराजांची समाधी कोकसर, ब्रह्माजींनी तपश्चर्या केलेले बरमान घाट, माहेश्वर, मंडलेश्वर, सिद्धेश्वर महादेव मंदिर नेमावर, अमरकंटक (नर्मदेचा उगम) अशी अनेक तिर्थक्षेत्रे आहेत. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी असे जामदार यांनी यावेळी सांगितले.

    नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने देशातील विविध राज्यातील लोकवस्ती, तेथील प्रथा परंपरा, धार्मिक वातावरण, मठ मंदिरे, पुरातन तिर्थक्षेत्रे यांची माहिती घेता आली पूर्वीच्याकाळी कसलीही साधने सुविधा नसताना लोकांनी जपलेली धर्मभावना अभ्यासता आल्याचे संजय जामदार यांनी सांगितले.

      आपल्या नर्मदा परिक्रमेत संजय जामदार यांनी कोळकी (फलटण), बारामती, नगर, शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे, धामनोद, ओंकारेश्वर, प्रकाशा, शहादा, भरुच, राजघाट, जबलपूर, जोगी टिकरीया, मंडला, दिंडोरी, अमरकंटक, महाराजपूर, नर्मदापुरम, हर्दा, ओंकारेश्वर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी, देहू, सासवड, जेजुरी येथील विविध धार्मिक स्थळे, मंदिरात दर्शने घेत परत कोळकी (फलटण) असा महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमा भागातून प्रवास केला. त्या त्या ठिकाणच्या समाजातील अनेक मान्यवर, धार्मिक स्थळे, मठ मंदिरातील व्यवस्थापक, भक्त मंडळी वगैरेंनी त्यांचे अभिनंदन  करुन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments