Breaking News

खा.रणजितसिंह यांच्या प्रयत्नांमुळेच फलटण-बारामती राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मंजुरी - जयकुमार शिंदे

Sanction of Phaltan-Baramati National Highway only due to the efforts of MP Ranjitsingh - Jayakumar Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मार्च - उंडवडी कडे पठार बारामती- फलटण या राष्ट्रीय महामार्गाच्या क्रमांक १६० च्या ३६ किमी अंतराच्या चौपदरीकरणाचे खडीकरण,डांबरीकरण कामास खासदार निंबाककर  यांच्या पाठपुराव्यामुळे दिनांक २१ मार्च रोजी मंजुरी मिळाली असून त्यासाठी मा.ना.नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने ७७८.१८कोटीची मंजुरी नुकतीच दिली असून याची माहिती भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

     मनमाड - अहमदनगर - दौंड - बारामती - फलटण - दहिवडी - विटा - तासगाव - मिरज या NH - १६० राष्ट्रीय महामार्गापैकी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (उंडवडी कडे पठार) ते बारामती - फलटण या ३८ कि.मी.रस्त्याच्या चौपदरीकरण कामाची खा.रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी  वारंवार ह्या चौपदरीकरांना साठी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची वारंवार दिल्ली येथे सातत्याने भेट घेऊन ह्या कामाचे बाबत माहिती  निदर्शनास आणून दिले.

     केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक, परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दि.२१ मार्चच्या पत्राने सदर कामासाठी ७७८.१८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे संपूर्ण पत्रव्यवहार केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने खा.रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्याशी केले असून ह्या कामा संदर्भात फलटण मधील कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये कारण म्हाडा लोकसभा मतदारसंघातील अनेक रस्ते व विकास कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावलेले आहेत  असे  जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी सांगितले.

No comments