Breaking News

बारामती - फलटण रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून चौपदरीकरण मंजूर - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Baramati - Phaltan Road sanctioned by National Highways Department in four lanes - Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मार्च - उंडवडी कडे पठार - बारामती - फलटण या ३६ कि. मी. अंतराच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH - 160 चे चौपदरीकरण व खडीकरण, डांबरीकरण कामास केंद्र शासनांतर्गत रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दि. २१ मार्च रोजी मंजूरी दिली असून त्यासाठी ७७८.१८ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

        मनमाड - अहमदनगर - दौंड - बारामती - फलटण - दहिवडी - विटा - तासगाव - मिरज या NH - 160 राष्ट्रीय महामार्गापैकी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (उंडवडी कडे पठार) ते बारामती - फलटण या ३८ कि. मी. रस्त्याच्या चौपदरीकरण कामाची  महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, आ. दिपकराव चव्हाण यांची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मान्य केल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

     केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक, परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दि. २१ मार्चच्या पत्राने सदर कामासाठी ७७८.१८ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे संचालकांना कळविले असल्याचेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

No comments