Breaking News

नवाब मलिक अटक व अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे निषेध

Protest on behalf of the minority section of the NCP to protest against the injustice done to Nawab Malik and the minority community.

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक राज्य मंत्री नवाब मलिक  यांना ईडी कडून अटक करण्यात आली, तीस वर्षांपूर्वीची जागा खरेदी  प्रकरण बाहेर काढून सदरची अटक केली आहे. महा विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून महा विकास आघाडीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे ईडी व सीबीआयचा ससेमिरा लागला आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रांची ईडी व सीबीआय द्वारे चौकशी करणे, अचानकपणे धाडी टाकणे, वेठीस धरणे अशा प्रकारे त्रास दिला जात आहे. तसेच अल्पसंख्यांक समाजातील कोणीही व्यक्ती असेल तर त्याचे नाते दाऊद इब्राहिमशी जोडले जात आहे.  सन २०१४ पासून अल्पसंख्यांक समुदायाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास दिला जात आहे, अशातच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ३० वर्षापूर्वीची  जागा खरेदीचे प्रकरण बाहेर काढून अटक करण्यात आली आहे, या अटकेच्या निषेधार्थ व अल्पसंख्यांक समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ फलटण तालुका फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देण्यात आले.  यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शिकंदर डांगे, तालुका अध्यक्ष अबीद खान, शहराध्यक्ष जमशेद पठाण, माजी नगरसेवक आसिफ मेटकरी, हाजी सादिक बागवान, उपाध्यक्ष मतीन बागवान, तालुका उपाध्यक्ष फिरोज शेख , अमीर शेख, रफिक शेख, इरफान शेख व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments