फलटण येथे फेरफार अदालत संपन्न ; ३९७ अर्ज प्राप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ मार्च - उपविभागीय अधिकारी फलटण उपविभाग फलटण व तहसिल कार्यालय फलटण यांचे संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियान अंतर्गत तालुका स्तरीय फेरफार अदालत दिनांक २४/०३/२०२२ रोजी तहसिल कार्यालय फलटण येथे घेण्यात आली. त्यामध्ये दिनांक- २४/०३/२०२२ रोजी प्रलंबित १९० नोंदी पैकी मुदत संपलेल्या १५३ इतक्या नोंदी मंजुर करण्यात आल्या.
दिनांक- २४/०३/२०२२ रोजीचे फेरफार अदालती मध्ये साध्या नोंदी अर्ज १४९ व वारस नोंदी अर्ज २५६ असे एकुण ३९७ अर्ज प्राप्त झाले. तसेच सदर नोंदी बाबत विविध कायदेशीर बाबींची पुर्तता करुन ३० एप्रिल पर्यत नोंदी निर्गत करणेची कार्यवाही करीत आहोत. सदर फेरफार अदालती मध्ये खालीलप्रमाणे नागरिकांना सुविधा देणेत आल्या होत्या.
१) सर्व प्रकारच्या नोंदी साठी आवश्यक अर्ज या ठिकाणी मोफत ठेवणेत आले होते. २) वारस नोंदणीसाठी आवश्यक प्रतिज्ञापत्र मोफत तयार करुन देणेत आले. तसेच सर्व यंत्रणा एकत्र उपलब्ध करुन देणेत आले. ३) वारस नोंदी बाबत आवश्यक प्रतिज्ञापत्रासाठी सेतु कार्यालय येथे स्वतंत्र व्यवस्था करणेत आली असल्याचे तहसिलदार समीर यादव यांनी कळविले आहे.

No comments