महिला दिना निमित्त स्वयंसिद्धा कडून 'ती, ची गाणी' गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
कोळकी (गंधवार्ता वृत्तसेवा) - स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'ती, ची गाणी' या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन ७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा ॲड. सौ. मधुबाला भोसले यांनी दिली.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावांजली अर्पण करण्यासाठी 'ती,ची गाणी' या कार्यक्रमांतर्गत लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या मराठी व हिंदी गाणी चैत्राली अभ्यंकर व सहकारी सादर करणार आहेत तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन ॲड.सौ. मधुबाला भोसले यांनी केले आहे.
No comments