बहुजन समाज पार्टी कडून फलटण आगार कर्मचारी यांना मदत व जाहीर पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण मध्ये बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी कडून फलटण आगार कर्मचारी यांना अडचणीच्या काळात मदत व जाहीर पाठिंबा देण्यात आला. विश्वरत्न बोधीसत्व डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले , नंतर फलटण एस. टी. आगार येथील ४०० जणांना तांदुळ वाटप करण्यात आले.
सर्वजन हिताय सर्वजन सुखाय तत्वावर अनुसरून बहुजन समाज पार्टी च्या सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्षा बहन कु मायावतीजी यांच्या आवाहनाला अनुसरून, महाराष्ट्र राज्य प्रदेश महासचिव किरण आल्हाट यांनी महाराष्ट्रात गेली पाच महिन्यापासून लालपरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस.टी महामंडळ) यांचे कर्मचारी मागण्यासाठी आंदोलन संपूर्णपणे महाराष्ट्रात सुरु आहे, त्या पैकी फलटण आगारातील कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांना जाहिर पाठिंबा दिला व त्यावेळी आल्हाट साहेबांनी त्यांच्या चालू परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार परस्थितीचा आढावा घेत एस.टी कर्मचारी यांचे हक्काधिकार,त्यांच्या मागण्याचा शासनदरबारी पाठपुरावा करणार आहेत. त्याचबरोबर बसपा च्या राज्यसभेच्या खासदारांमार्फत लोकसभा व राज्यसभेत विषय मांडण्यासाठी पाठपुरावा करणार, तसेच कर्मचारी यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार अशी ग्वाही देऊन, फलटण आगारातील पगारावाचून उपासमारीनं व्यथित झालेल्या ४०० कुटुंबाला बहुजन समाज पार्टी सातारा जिल्हा कमिटी बरोबरच फलटण विधानसभा पदाधिकारी यांच्या वतीने अल्हाट साहेब यांच्या नियोजनाखाली त्या कुटुंबाना पाठिंबा देऊन, प्रत्येकी व्यक्तीला (अन्नपुर्णा कोलम बासमती )तांदुळ प्रत्येकी १० किलोची बॅग एकुण ४ टण तांदूळ देऊन बसपाकडून सहकार्य करण्यात आले.
यावेळी एस.टी.महामंडळ चे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहिले. यावेळी उपस्थित सातारा जिल्हा अध्यक्ष मा.आनंदजी थोरवडे साहेब , सातारा जिल्हा प्रभारी प्रा.नारायण काळेल सर ,सातारा जिल्हा प्रभारी उदय काकडे, उपाध्यक्ष महेशजी सराटे , जिल्हा सचिव मंगेशभाऊ मोरे, जिल्हा सचिव संदेशजी वाघमारे तसेच पुणे जिल्हा माजी अध्यक्ष विजयकुमार जगताप ,बारामती चे साळवे, आटोळे, कांबळे, फलटण विधानसभा अध्यक्ष प्रदिप उर्फ प्रेम सुरेश मोरे,उपाध्यक्ष दिनेश कांबळे, कोषाध्यक्ष प्रविण विटकर,महासचिव गॊतमजी भोसले,फलटण ओबीसी भाईचारा किरणजी हैसारे तसेच फलटण शहर प्रमुख सुहास काकडे, सागर खुडे , महिला भगिनी सौ. सोनालीताई शिलवंत, सौ. प्रितीताई काकडे, कु.सोनालीताई फाळके,कोमलताई फाळके, सौ. प्रियंकाताई सावंत, सौ. रोहिणीताई फाळके, सौ. जयश्री सुरेश मोरे, सौ सुप्रिया प्रेम मोरे, समाजसेवक बंडू अहिवळे उपस्थित होते.
No comments