Breaking News

महिला दिना निमित्त मुधोजी महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धा व महिला पुरस्कार

District level women's wrestling competition and women's award at Mudhoji College on the occasion of Women's Day

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ मार्च - जागतिक  महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमंत  छत्रपती महाराणी सईबाई महाराज महिला कुस्ती प्रशिक्षण  केंद्र,  मुधोजी महाविद्यालय , फलटण येथे जिल्हास्तरीय महिला  कुस्ती स्पर्धा व विजयमाला महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन  मंगळवार दि. ८ मार्च २०२२  रोजी करण्यात आले आहे. 

     जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना मुधोजी महाविद्यालयातर्फे  श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजयमाला महिला पुरस्कार देण्यात येणार आहे.  सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले  अध्यक्षा, स्वयंसिद्धा उद्योग समूह , छाया दगडू बोबडे, कोळकी व सौ. शालन नाना येळे, अध्यक्षा, महिला बचत गट, काळज यांना विजयमाला महिला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. विजयमाला महिला पुरस्काराचे वितरण फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा मा. सौ. नीता मिलिंद नेवसे यांच्या शुभ हस्ते  करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे भूषविणार  असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी दिली आहे . 

कुस्ती स्पर्धेमध्ये मॅट वरील कुस्ती स्पर्धा -
वयोगट  - ४  वर्षाखालील मुली 
वजनगट - ३० किलो, ३६ किलो, ४२ किलो
वयोगट - १७ वर्षाखालील मुली 
वजनगट - ४०किलो, ४३ किलो , ४९ किलो 
वयोगट - १९ वर्षाखालील मुली 
वजनगट - ५०किलो, ५५ किलो, ५५ किलो

      सर्व वयोगटातील आणि वजन गटातील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी सदरच्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन छत्रपती महाराणी सईबाई महाराज महिला कुस्ती प्रशिक्षण  केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments