Breaking News

राजाळे येथे तलवारीसह एकास अटक; आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

One arrested with sword at Rajale; Filed an offense under the Arms Act

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ मार्च- राजाळे ता. फलटण येथील सरकारी दवाखान्यासमोर, शर्टाचे आत  मागील बाजूस लपवलेल्या लोखंडी तलवारीसह राजाळे येथील तात्यासो शिवाजी रिटे यास फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्या विरोधात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ मार्च २०२२ रोजी रात्री १०:४० वाजण्याच्या सुमारास मौजे राजाळे, ता. फलटण गावचे हद्दीत सरकारी दवाखान्यासमोर, तात्यासो शिवाजी रिटे रा. राजाळे तालुका फलटण याच्याकडे,शर्टाचे आतमध्ये मागील बाजूस लपवलेली २६.५ इंच लांब लोखंडी तलवार सापडली, त्यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या विरुद्ध आर्म ॲक्ट कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे हे करीत आहेत.

No comments