Breaking News

अखेरच्या श्वासापर्यंत उपोषण चालू राहणार - दिगंबर आगवणे

The fast will continue till the last breath - Digambar Aagawane

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मार्च -  सामन्याचा  आवाज दडपण्याचा प्रयत्न चालू आहे, पण हा आवाज सहजासहजी दडपला जाणार नाही,अखेरच्या श्वासापर्यंत उपोषण चालू राहणार यात कुठेही शंका नाही, मी जे मुद्दे उपस्थित केले आहेत, ते पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याचे दिगंबर आगवणे यांनी जाहीर केले.

    काल दिनांक २४ मार्च रोजी दिगंबर आगवणे यांना प्रकृती कारणास्तव उपोषणस्थळावरून पोलिसांनी सातारा येथे जिल्हा रुग्णालयात  नेले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रात्री  १० वाजण्याच्या दरम्यान सोडण्यात आले, त्यानंतर आज दिनांक २५ मार्च रोजी सकाळपासून दिगंबर आगवणे यांनी पुन्हा फलटण येथे उपोषणाला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील निर्णय जाहीर केला. 

    पुढे बोलताना दिगंबर आगवणे यांनी सांगितले की, काल वाठार निंबाळकर येथील त्यांच्या  कंपनीमध्ये काही व्यक्तींनी अनधिकृत पणे प्रवेश केला होता, त्यांनी का प्रवेश केला ? कशासाठी केला?  हे अद्याप गुलदस्त्यातच आहे,  महावितरणचे काही लोक त्यांच्या सोबत आले होते, त्यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती, की माझ्या कंपनीत चोरून वीज वापरली जात आहे, त्याची खात्री करण्याकरिता एमएसईबी चे लोक आले होते, त्यांना तेथे कोणताही वीज चोरीचा प्रकार आढळून आला नसल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले. हे दबावाचे व दडपशाहीचे राजकारण कुठेतरी संपवावे लागणार असल्याचे दिगंबर आगवणे यांनी सांगितले.

No comments